CavinKare case study|कमी किंमत?मोठा फायदा!
आजचा हा लेख अशा व्यक्तीबद्दल आणि व्यवसायाबद्दल आहे ज्यांनी FMCG च्या सगळ्या नियमांना पार करून स्वतःच्या बिझनेस ला एका उंचीवर नेऊन ठेवले.या व्यक्तीने सॅशे प्रॉडक्ट पद्धत व्यवसायात आणून पारंपरिक उद्योजकतेला नवी दिशा देण्याचे काम केले.आज त्यांची कंपनी यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचली आहे.या व्यक्तीचं नाव आहे सी.के.रंगनाथन.आणि त्यांची कंपनी आहे केविनकेयर. त्यांची आतापर्यंतची वाटचाल नक्कीच सोपी नव्हती.खूप संघर्ष आणि कठोर मेहनतीने त्यांनी कंपनीला कश्या पद्धतीने आणि किती उंचीवर नेऊन ठेवले हे जाणून घेऊ. तामिळनाडूमधील एका लहानश्या खेड्यात सी.के.रंगनाथन यांचा जन्म झाला.त्यांच्या वडिलांचा शेती सोबतच एक लहानसा व्यवसाय होता.रंगनाथन यांची अभ्यासातील गती फारशी चांगली नव्हती.त्यामुळे त्यांच्या वडिलांची त्यांनी शेती किंवा बिझनेस यापैकी एक काहीतरी करावे अशी इच्छा होती.महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी रंगनाथन यांच्यावर आली. रंगनाथन यांनी शाम्पू बनवण्याचा एक लहानसा व्यवसाय सुरु केला.वडिलांच्या नावावरून त्यांनी चिक इंडिया नावाने कंपन...

Comments
Post a Comment